श्रीराम नवमीनिमित्त हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान माळशिरसच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन #श्रीराम नवमी #हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान माळशिरस
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील हिंदूराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त जन्मोत्सव व भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण भारत वर्षाचे श्रद्धास्थान प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव व संपूर्ण हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या भव्य शोभायात्रेचे यावर्षीपासून माळशिरस नगरीत आयोजन करण्यात येत आहे.

या जन्मोत्सवांमध्ये गुरुवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ११ वा. प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वा. प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी माळशिरस शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
या शोभा यात्रेमध्ये प्रभू श्रीरामांचा राजसू यदव्याचे अश्व, वारकरी संप्रदाय दिंडी, रामरथ, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवताल ढोल पथक, हरियाणा येथील महाबली हनुमान जिवंत देखावा, उंट, महादेव व नंदीबैल, मानाचा महाराजा हत्ती, श्रीराम प्रति मूर्ती इत्यादी खास आकर्षण आहे. तरी जास्तीत जास्त राम भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार या धर्म उत्सवात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng