Uncategorizedताज्या बातम्या

नीरा देवधर प्रकल्पातील वंचित गावांना पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांसोबत राहणार लोकप्रिय आमदार राम सातपुते.

नीरा देवधर पाणी संघर्ष समितीचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.


माळशिरस ( बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील निरा देवधर पाण्यापासून पिढ्यानपिढ्या वंचित असणाऱ्या गावांना पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांसोबत राहणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी शासकीय विश्राम गृह माळशिरस येथे निरा देवधर संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे पत्र देण्यात आले यावेळी उपस्थितांना आश्वासित केले.


माळशिरस तालुक्यातील मौजे बचेरी येथील निरा देवधर पाणी संघर्ष समितीची बैठक बुधवार दिनांक 22 320 23 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता हनुमान मंदिर बचेरी येथे समितीचे अध्यक्ष श्री शंकर रामहरी शिकारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली त्या सभेस गावातील महिलांसह लहान मुले पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये नीरा देवधर प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळाले बाबत असा विषय घेण्यात आला या विषयावर सखोल चर्चा झाली चर्चे आणती मौजे बचेरी तालुका माळशिरस या कायमस्वरूपी दुष्काळी गावच्या शेतीला निरा देवधर प्रकल्पाचे पाणी मिळावे हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अखेरचा लढा देण्याचे ठरले शासन व प्रशासन यांना गावच्या पाणी प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे सर्वानुमते ठरण्यात आले आहे याबाबत ठराव आमदार खासदार वरिष्ठ प्रशासन व शासन स्तरावर देण्याचे ठरविलेले आहे त्याप्रमाणे माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना ठरावाची नक्कल नीरा देवधर पाणी संघर्ष समिती बचेरी अध्यक्ष शंकर शिकारे उपाध्यक्ष मच्छिंद्र थिटे सचिव सोमनाथ गाढवे कार्याध्यक्ष बिरुदेव शिंदे व सचिन शिकारे खजिनदार शिवाजी सावळसकर मार्गदर्शक सरपंच महादेव पाटील उपसरपंच मोहन शिकारे माजी सरपंच सर्जेराव कोकरे माजी उपसरपंच वामनराव शिकारे सुभाष शिकारे माजी सरपंच सौ. अस्मिता शिंदे चेअरमन भारत शिखरे व्हाईट चेअरमन फायबर शिंदे सदस्य श्रीमंत कारंडे समन्वयक गणेश गोडसे संघटक सत्यवान यादव सुदाम शिंदे अधिकराव माने गोरख शिंदे शिवाजी शिंदे माऊली काटे अमोल काटे गणेश पाटील श्री गणेश देशमुख विश्वजीत गोरड एडवोकेट अमस्ती देशमुख मिलिंद इनामदार प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक सदाशिव शिंदे आदिमसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


पुढे बोलताना लोकप्रिय दमदार आमदार म्हणाले माळशिरस तालुक्यातील बचेरी गावासारखी अनेक गावे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत पाण्यासाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे जनतेसोबत संघर्षामध्ये सहभागी असून निश्चितपणे वंचित गावांना पाणी मिळण्याकरता कायम आपल्या पाठीशी ठाम असल्याचे उपस्थित निरा देवधर पाणी संघर्ष समिती बचेरी यांना सांगितले. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या सकारात्मक भूमिकेवर उपस्थित बचेरी करांनी समाधान व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button