….आमचं ठरलं !!! अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप बुद्रुक सामावून घेण्याचं ठरवलं…
मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे यांना पुन्हा संधी तर अनेक नवीन चेहऱ्यांना प्राधान्य..
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोहिते पाटील गट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच होत आहे. या निवडणुकीत भाजपमधील जुना बुद्रुक गट सामावून घेणार का ? असे वृत्त बारामती झटका न्यूज चॅनलने प्रसारित केल्यानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक योजना भाजप बुद्रुक सामावून घेण्याची ठरलं आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहणार आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर, उर्वरित नवीन चेहऱ्यांना सामावून घेतलेले आहे. भाजपच्या जुन्या गटातील नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक ॲड. भानुदास राऊत व अहिल्यादेवी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन युवा नेते संदीप पाटील यांना संधी दिली जाणार आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वेळापूर, कोळेगाव, खळवे, तांबेवाडी, इस्लामपूर या गावांसह अनेक गावांना संधी मिळणार आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला झुकते माप दिलेले आहेत. नातेपुते शहरातील अठरापैकी चार संचालक असणार आहे. विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अकरा, ग्रामपंचायत मतदार संघात चार, व्यापारी मतदारसंघात दोन तर हमाल तोलार मतदार संघ एक असे उमेदवार असणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng