उंबरदेव येथे पाणीपोई चे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या शुभहस्ते उद्घाटन
उंबरदेव (बारामती झटका)
उंबरदेव येथे भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या शुभहस्ते पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शंभू महादेवाच्या यात्रेचा कालावधी चैत्र महिन्यामध्ये सुरू होतो. या कालावधीमध्ये लाखो वारकरी नातेपुते मार्गे शिंगणापूर या ठिकाणी शंभू महादेव दर्शनाला जात असतात. त्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून उंबरदेव येथे मोफत पाणपोई हनुमंत श्रीरंग कर्चे चिटणीस भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व माजी विस्तारक सांगोला, दत्ता कर्चे किसान सेल उपाध्यक्ष माळशिरस तालुका, रवींद्र कर्चे राजेंद्र कर्चे यांच्यामार्फत पाणपोई चालू करण्यात आली आहे.
सदर उद्घाटन श्री बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, संजय देशमुख माळशिरस तालुका सरचिटणीस भाजप, गणेश पागे प्रमुख, विश्व हिंदू परिषद संघटक, युवराज वाघमोडे युवा उपाध्यक्ष भाजप, मंगेश दीक्षित विश्व हिंदू प्रसिद्ध, दादा कर्चे ग्रामपंचायत सदस्य पिंपरी, अविनाश कर्चे कला क्रीडा मंडळ अध्यक्ष, पिंपरी भूविकासोसाठी माजी सदस्य, आप्पा कर्चे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष, नानासो कर्चे माजी ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण राणे ग्रामपंचायत सदस्य माजी, सदाशिव बंडगर आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे, रजक मुलाणी आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे, आनंद धाईजे आरोग्य सहाय्यक केंद्र मांडवे, ज्ञानेश्वर कर्चे, हनुमंत कर्चे समाजसेवक पिंपरी, सूर्या कर्चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले, गेली अनेक वर्ष हनुमंत कर्चे व मित्र मंडळ शिंगणापूर यात्रेच्या माध्यमातून यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात. हे खूप मोठे पुण्याचे काम त्यांचे चालू आहे. नेहमी समाजकारणामध्ये अग्रेसर असतात. त्यांनी आत्तापर्यंत माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून पिंपरी परिसरामध्ये अनेक समाज उपयोगी काम केल्याने ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng