सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तुत्वाने यशाच्या शिखराकडे वाटचाल करणारे बाळासाहेब सरगर दिलदार व्यक्तिमत्व..
माळशिरस (बारामती झटका)
कन्हेर ता. माळशिरस, या गावचे सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तुत्वाने यशाच्या शिखराकडे वाटचाल करणारे दिलदार व्यक्तिमत्व बाळासाहेब सरगर यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कन्हेर सारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये बाळासाहेब सरगर यांचा जन्म झालेला आहे. घराण्यामध्ये राजकीय इतिहास नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिकपणे सरगर परिवारातील तीन पिढ्या एकनिष्ठेने आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माळशिरस शहराच्या माजी सरपंच ॲड. संजीवनीताई पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून बाळासाहेब सरगर यांची ओळख आहे.
भाजपमध्ये कार्यकर्ता ते भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, असा खडतर प्रवास राजकारणात केलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा देवधर कॅनलचा प्रश्न मिटावा यासाठी बाळासाहेब सरगर व वंचित असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन निरा देवधर संघर्ष समितीची स्थापना करून पाण्याचा संघर्ष पेटवत ठेवलेला आहे. बाळासाहेब सरगर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक चढ उतार आले तरीसुद्धा बाळासाहेब सरगर भाजप पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. त्यामुळेच बाळासाहेब सरगर माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. माळशिरस तालुक्यामध्ये काम करीत असताना ॲड. संजीवनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य उद्योजक दत्तात्रय शेळके, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू, अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, डॉ. अक्षय वायकर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उर्फ पिनू माने यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत पक्षाचे काम सुरू असते. सर्व जाती धर्मातील व सर्व राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्यासोबत बाळासाहेब सरगर यांचे सलोख्याचे व मैत्रीचे संबंध आहेत. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, राजासारखे मन असे असणारे बाळासाहेब सरगर यांच्यावर वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng