अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारांची आदलाबदल…
मनामधील पराभव रणांगणात विजयाकडे घेऊन जात नाही, मात्र रणांगणात झालेला पराभव विजयाकडे घेऊन जातो…
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारांची अदलाबदल झालेली आहे. निवडणुकीच्या रणांगणात मनात पराभव झाल्यानंतर रणांगणात विजयाकडे घेऊन जात नाही मात्र, रणांगणात झालेला पराभव विजयाकडे घेऊन जातो हा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होईल, असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज बांधलेला आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी 81 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरलेली होती. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 जागांसाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी केशवराव कृष्णराव पाटील उर्फ के. के. पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव बाळासाहेब घाडगे उर्फ दादाराजे घाडगे अशा दिग्गज मंडळींनी ग्रामपंचायत मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी मोहिते पाटील गटाची पुंगी टाईट झाली.

सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती बापूराव नारायण पांढरे उर्फ मामासाहेब पांढरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मण अगतराव पवार, कोंडबावी गावचे माजी सरपंच विष्णू सदाशिव घाडगे यांचे उमेदवारी अर्ज असतानासुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शहाजीराव मुधोजीराव देशमुख उर्फ बाबाराजे यांचा ग्रामपंचायत मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख उर्फ आबासाहेब यांचा उमेदवारी अर्ज सहकारी संस्था मतदारसंघात दाखल केलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मण पवार यांचा ग्रामपंचायत मतदार संघात उमेदवारी अर्ज असताना सहकारी संस्था मतदार संघात नव्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून निश्चित केलेल्या उमेदवारांमध्ये फेरबदल म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळी अगोदरच पराभव दिसला की काय अशी शंका राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केली जात आहे.
खरे चित्र दि. 20/04/2023 रोजी उमेदवारी अर्ज पाठीमागे कोण घेणार यावरून ठरणार आहे. मात्र, उमेदवार बदलामुळे मोहिते पाटील सत्ताधारी गटाचा मानसिक पराभव झालेला असावा, अशी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे. मनामधील पराभव रणांगणात विजयाकडे घेऊन जात नाही मात्र, गत निवडणुकीत राहणार पराभव विजयाकडे घेऊन जातो असा विरोधी गटांचा उमेदवार बदलाने आत्मविश्वास वाढलेला आहे.

माळीनगर येथे दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजन भाऊ गिरमे यांच्या निवासस्थानी सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीविषयी रणनीती ठरलेली होती. त्याप्रमाणे निवडणुकीत रंगत येत आहे. यावेळेला सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात विरोधी गटाकडून मोळी बांधण्यात आलेली आहे जर, या मोळीतून एखादा विरोधक समाविष्ट झाला नाही तर तालुक्यातील जनता खड्यासारखे बाजूला करण्याच्या मानसिकतेमध्ये मतदार आलेला आहे. निवडणूक रंगतदार होणार आहे. काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना उघड उघड येता येत नाही मात्र, अनेकजण सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या बदलाच्या वाऱ्यात वाहत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng