Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक
भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा तर जिल्ह्यात आठवा
करमाळा (बारामती झटका)
करमाळा येथील अमरनाथ महेश चिवटे इ. ४ थी याचा भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १४ वा तर जिल्ह्यात ८ वा क्रमांक आला आहे. अमरनाथला सारिका चेंडगे व सिद्धी रोकडे, आई अपर्णा चिवटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.
अमरनाथ चिवटे हा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून या संस्थेचे मुख्याध्यापक नितीन भोगे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अमरनाथ चिवटे याच्यावर या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक तसेच करमाळा परिसरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng