मोरोची गावचे सरपंच समाधान गोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
१३ सदस्यांमधील कोणते ३ सदस्य सरपंचाच्या बाजूने ??
मोरोची (बारामती झटका)
मोरोची ता. माळशिरस येथील सरपंच समाधान गोरे यांच्याविरुध्द अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अविश्वास ठरावावर बैठक घेण्यात आली होती. यावेळी १३ सदस्य उपस्थित होते. यावेळी सरपंच समाधान गोरे यांनी लेखी स्वरुपात गुप्त मतदान करण्याची मागणी केली. त्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले.
यावेळी १३ सदस्यांनी गुप्त मतदान केले. त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने १० सदस्य आणि ३ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. असा अविश्वास प्रस्ताव १० विरुध्द ३ मतांनी ठराव मंजूर झाला आहे. १३ सदस्य असताना त्यातील ३ सदस्य सरपंचाच्या बाजूने आहेत. ते कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी नातेपुते पोलीस स्टेशन यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng