पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झालेला आहे. शनिवार दि. 08/04/2023 रोजी लोणी ता. राहता येथील निवासस्थानापासून मोटारीने येऊन हेलिकॉप्टरने सकाळी 09 वाजता निघून सकाळी 10 वाजता सांगोला विद्यालय सांगोला येथे हेलिपॅडवर आगमन होऊन मोटारीने शासकीय विश्रामगृह सांगोला येथे आगमन व राखीव आहेत. 11 वाजता राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन सांगोला येथील ग. दि. माडगूळकर विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 01 वाजता चेतन केदार सावंत भाजप तालुका अध्यक्ष यांचे सांगोला शहरातील वासुद रोड वरील निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव 01.30 वाजता मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण होवून त्यानंतर हेलिकॉप्टरने सोलापूरकडे प्रयाण करतील. सोलापूर विमानतळावर 02 वाजता आगमन होऊन मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 02 वाजून 30 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकांना उपस्थित राहून त्यामध्ये स्मार्ट सिटी सोलापूर विकास आराखडा सोलापूर विद्यापीठ येथे अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात विद्यापीठ समिती समवेत बैठक घेऊन विविध प्रशासकीय विभागाचे पुढील आर्थिक विषयाचे नियोजन व विविध कामांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करून शासन स्तरावर प्रलंबित असलेले विषयांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत बैठका चालणार आहेत. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण आगमन राखीव व मुक्काम दि. 09/04/2023 रोजी सकाळी 07.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण होऊन हेलिकॉप्टरने सकाळी 08 वाजता शिर्डी, जि अहमदनगरकडे प्रयाण करणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng