माळशिरस तालुक्यात विज पडली, धक्का पोहोचला, मात्र जीवित हानी टळली….
शेतकरी बांधवांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, शक्यतो घराबाहेर पडल्यानंतर झाडाखाली थांबू नका..
इस्लामपूर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात इस्लामपूर येथे दिलीप दादासो पवार यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज पडली आहे. विजेचा धक्का जोरदार होता 200 मीटर पर्यंत जाणवला. विजेमुळे धक्का जाणवला मात्र, जीवित व वित्तहानी झालेली नाही. शेतकऱ्यांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, घराबाहेर पडल्यानंतर विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाच्या खाली थांबू नये. सतर्क राहण्याची गरज आहे.
हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी 08,09,10,11 या तारखेला अवकाळी पाऊस व विजांचा कडकडाट होऊ शकतो, असा खात्रीशीर अंदाज वर्तवलेला होता. त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार व हलक्या सरी पडलेल्या आहेत. अवकाशामध्ये ढगांचा कडकडाट सुरू होता.
आज शनिवार दि. 08/04/2023 रोजी दुपारी 04.30 वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर येथील दिलीप दादासो पवार यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळलेली आहे. विजेची एवढी प्रचंड तीव्रता होती, झाडाला आग लागलेली आहे. 200 मीटरच्या आसपास विजेचा झटका लाईटचा करंट बसावा अशा पद्धतीने होता. जीवित व वित्तहानी टळलेली आहे.
शेतकरी बांधवांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. खरंच गरज असेल तरच पुढील दोन दिवसांमध्ये घराबाहेर पडा. घराबाहेर पडल्यानंतर शक्यतो काम आटपून लवकर घरी यावे. रस्त्यामध्ये झाडाखाली ढगांचा कडकडाट सुरू असताना थांबू नये. शेतकरी बांधवांनी सतर्क रहावे. आपल्या परिसरामध्ये पाऊस, वारा व गारा यांची माहिती बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 व 91 30 10 32 14 या नंबरवर संपर्क साधून आपल्या भागातील परिस्थिती वेळोवेळी कळवावी.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng