माळशिरस तालुक्यातील वाघोली येथे शेतकरी मेळावा संपन्न
वाघोली (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वाघोली व वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. सदर शेतकरी मेळाव्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव, माळशिरस तालुका बँक इन्स्पेक्टर दीक्षित साहेब उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक चंद्रकांत चव्हाण यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्याचा आढावा सांगितला. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मध्यम मुदत शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी, शेतातील पाईपलाईन करण्यासाठी, शेती अवजारे घेण्यासाठी कर्जवाटप चालू करावे. तसेच वाघोली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एटीएम सुविधा चालू करावी, अशा प्रकारच्या मागण्या केल्या.
सदर मेळाव्यास आर. एन. जाधव साहेब यांनी मार्गदर्शन करत असताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. त्यात त्यांनी तोट्यातली बँक नफ्यात येऊन पुढील वर्षापासून बँक लाभांश वाटपास पात्र होत असल्याचे सांगितले. बँकेवर प्रशासक नेमल्यापासून फार मोठ्या प्रमाणात बँकेची कर्ज वसुली झाली असून इथून पुढच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना चालू करणार असून त्या योजनांचा विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर मेळाव्यात वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बँक स्तरावरची शंभर टक्के वसुली झाल्यामुळे सोसायटीचे चेअरमन अशोक चंद्रकांत चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर शाखा वाघोली दिलेले सर्व प्रकारचे टार्गेट पूर्ण केल्याबद्दल व सदरची टार्गेट पूर्ण करण्यासाठी बहुमोल असं योगदान दिलेल्या सभासदांचा व शाखा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर मेळाव्यास पंचायत समिती माळशिरसचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे, वि. का. वि. सोसायटीचे माजी चेअरमन विष्णू वासुदेव मिसाळ, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवान मिसाळ, प्रतापसिंह मोहिते पाटील वि. का. वि. संस्थेचे चेअरमन हरिदास मिसाळ, तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे बँक इन्स्पेक्टर इनामदार साहेब, वाघोली ग्रामपंचायत उपसरपंच पंडित मिसाळ, वाघोली शाखेचे शाखाप्रमुख विठ्ठल भोसले, त्यांचे सर्व कर्मचारी, वाघोली शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या चार संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे सचिव तसेच वाघोली, वाफेगाव येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.
सदर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी करून आभार वाघोली वि. का. वि. संस्थेचे चेअरमन अशोक चव्हाण यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng