सौंदने येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मोहोळ (बारामती झटका)
समाजातील अनिष्ट रुढी व परंपरांविरुद्ध आवाज उठवुन त्या काळात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या हिताचे काम केले. स्त्रीया व मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. त्यामुळे फुले दांपत्याचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील सौंदने येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच भास्कर माने, लोकनेतेचे संचालक बब्रुवान माळी, भिमाचे माजी संचालक संभाजी माने, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोकाशी, माळी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे, प्रेमनाथ सोनवणे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी संतोष भानवसे, दाजी भानवसे, प्रेमनाथ सोनवणे यांनी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस भरतीमध्ये निवड झालेले मोहोन भानवसे, अमोल राऊत यांचा सत्कार मान्यवराच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत चौधरी, अमोल माळी, तानाजी सुतकर, सयाजी राऊत, अमोल नामदे, धनंजय भानवसे, बाळासाहेब भानवसे, सज्जन वाघमारे, गणेश सुतकार, विष्णू म्हेत्रे, सागर वाघमारे, विनायक भानवसे, मंगेश भानवसे, तुकाराम भानवसे, सुग्रीव भानवसे, शिवाजी माळी, बापु बनसोडे, किसन वाघमारे, उमाजी राऊत, संजय सूतकर, विकास भानवसे, दत्ता राऊत, तुळशीराम माळी, तानाजी माळी, दत्ता भानवसे, संजय भानवसे, सचिन वसेकर, दिगंबर बनसोडे, काशिनाथ माळी, हरिदास म्हेत्रे, निव्रुत्ती राऊत, कल्याण भानवसे, प्रविण राऊत, दत्ता बनसोडे, सुभाष वसेकर, विकास चौगुले, भारत राऊत, अर्जुन भानवसे, सतीश माळी, मचिंद्र भानवसे, मारुति वसेकर, शंकर माळी, राहुल भानवसे, दत्ता मोकाशी, नागेश नामदे, राजेंद्र मोकाशी, संतोष नामदे, प्रकाश माने, रुपेश चौधरी, राजेंद्र भानवसे, महादेव बनसोडे, पोपट भानवसे, प्रकाश भानवसे यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रम परिसरात विद्युत रोषनाई केली असल्यामुळे परिसर खुपच आकर्षक दिसत होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng