खडीकरण रस्त्याच्या कामात ठेकेदाराने मुरमाची रांगोळी घालून मलमपट्टी लावलेली आहे..
अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे रस्त्याचे पैसे कॅनॉलच्या पाण्यातच जाणार….
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी हद्दीमध्ये कॅनलवर खडीकरण रस्त्याच्या कामात खडीचा कमी थर तर मुरमाची रांगोळी घालून मलमपट्टी लावलेली आहे. सदरचा रस्ता कॅनलच्या कडेला असल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेले पैसे कॅनलच्या पाण्यातच जाणार का ?, असा सवाल वाहनधारक व स्थानिक नागरिक यांच्यामधून उपस्थित होत आहे.
मुख्य कॅनलवर भांबुर्डी गावच्या हद्दीत कॅनॉलपट्टीवर खडीकरण व मुरमीकरण केलेले आहे. ठेकेदार यांनी कामाची सुरुवात करीत असताना खडीची जाडी असणारा थर दिलेला आहे. 50 मीटर पुढे गेल्यानंतर रस्त्याची थिकनेस पाहण्यासारखी आहे. त्यावर टाकलेला मुरूम रांगोळी घातल्यासारखा आहे. कॅनलवर खड्डे व रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिक व वाहनधारक यांनी रस्ता व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून सदरच्या रस्त्यावर निधी मंजूर करून घेतलेला आहे. निधी मंजूर केल्यानंतर सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. मात्र, ठेकेदाराने केलेला रस्ता पाहिल्यानंतर स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्या आनंदावर विरजण पडलेले आहे.
खऱ्या अर्थाने शाखा अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे काम होत असते. रस्ते मजबूत व टिकाऊ होणे गरजेचे असताना अधिकारी व ठेकेदार रस्ता किती दिवस टिकतो यापेक्षा आर्थिक संबंध किती दिवस टिकतात, याकडे पाहतात. सदरच्या रस्त्याच्या ठेकेदाराची कसून चौकशी करून सदरची एजन्सी काळ्या यादीत टाकावी, या मागणीने जोर धरलेला आहे. सदरच्या रस्त्यावर ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्यास स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया भयानक आहेत. यासाठी अधिकारी व ठेकेदार यांनी सदरच्या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करावे अन्यथा, स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
MyCellSpy est une application puissante pour la surveillance à distance en temps réel des téléphones Android.