हडपसर येथे विठ्ठल बिरूदेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली..
विझोरी गावचे युवा उद्योजक रोहन काळे पाटील यांनी अध्यात्माची सामाजिक बांधिलकी जपली…
पुणे ( बारामती झटका )
हडपसर पुणे येथील मंदिरामध्ये विठ्ठल बिरूदेवाच्या मूर्तीची विझोरी गावचे सुपुत्र उद्योजक रोहन काळे पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत खेलोबा देव वाघमोडे, फरांडे महाराज, विठ्ठल बिरूदेवाचे पुजारी मुरारी काका, घनश्याम बापू हाके, उज्वलाताई हाके, महादेव वाघमोडे, दामोदरदादा मैंदाळ, बिरुदेव सातपुते, अनिल धायगुडे, मीनाताई थोरात, माणिकराव चोरमले, अभिमानी उघडे, विक्रम वाघमोडे, पिंटू महानवर, महादेव शिंदे, बाबुराव बनसोडे, गोविंद वीरकर, चंद्रशेखर सोनटक्के, संतोष शेवाळे, सुरेश शेवाळे, बापू देवकाते, किसन सरवदे, हनुमंतराव दोलताडे, राजेंद्र कोळेकर, बाळासाहेब ढोरमारे, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब डफळ सर्व बांधव उपस्थित होते.


हडपसर येथे नव्याने मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. समाजामधील दानशूर व्यक्तीने मंदिरासाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. सुसज्ज अशा मंदिरामध्ये युवा उद्योजक रोहन काळे पाटील यांनी पंढरपूर येथून विठ्ठल बिरूदेवाच्या मूर्ती तयार करून मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. खऱ्या अर्थाने अध्यात्माची सामाजिक बांधिलकी रोहन काळे पाटील यांनी जपलेली आहे. मुळगाव विझोरी, ता. माळशिरस येथील रहिवासी असून उद्योग व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. उद्योग व्यवसायामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे. लहानपणापासून अध्यात्माची व सामाजिक कार्याची आवड आहे. रोहन काळे पाटील यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
