Uncategorized

मोहिते पाटील यांनी घरातील उमेदवार उभा करायला पाहिजे होता, कार्यकर्त्यांना बळीचा बकरा बनवला – गौतमआबा माने पाटील

103 गावातील 1,151 ग्रामपंचायत मतदार संघात मतदार आहेत, गावनिहाय मतदारांची संख्या पाहिल्यानंतर निकाल वाचकांनासुद्धा समजण्यासारखा आहे.

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील परिवारातील उमेदवार उभा करायला पाहिजे होता. कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवला असल्याचे मत माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते गौतमआबा माने पाटील यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीविषयी दिलखुलास चर्चा करताना सांगितले.

गतवेळच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात मोहिते पाटील गटाचे उमेदवार निसटत्या फरकाने विजयी झालेले आहेत. गतवेळच्या निवडणुकीत नातेपुते 17, अकलूज 17, माळेवाडी अकलूज 11 व महाळुंग श्रीपुर 17 या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलेले होते. तरीसुद्धा थोड्याफार मताने उमेदवार पडलेले होते‌. यंदाच्या निवडणुकीत वरील ग्रामपंचायतचे मतदान कमी झालेले आहे. ग्रामपंचायत मतदार संघात पद्मजादेवी मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, के. के. पाटील, दादाराजे घाडगे यांच्या उमेदवारी दाखल केल्यानंतर शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी परिवारातील सदस्य उभा करायला पाहिजे होता. तसे न करता बाबाराजे देशमुख, बापूराव पांढरे, लक्ष्मण पवार, विष्णू घाडगे अशा कार्यकर्त्यांना उभे करून बळीचा बकरा केला असल्याचे मत गौतमआबा माने पाटील यांनी व्यक्त केलेले आहे.

ग्रामपंचायतच्या मतदारांची आकडेवारी आणि गावातील कल पाहता शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी सत्वपरीक्षा घ्यायला नको, अशी भूमिका घेतलेली असल्याची टीका करून ग्रामपंचायत मतदार संघात निश्चितपणे विजय मिळवून सहकारी संस्था मतदार संघात सुद्धा मुसंडी मारणार असल्याचे ठामपणे माने पाटील यांनी सांगितले आहे.
गौतमआबा माने पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या मतदारांची आकडेवारी सांगितल्यानंतर सत्ताधारी मोहिते पाटील गट व विरोधी गट यांच्यामधील किती मतांचा फरक पडेल वाचकांना अभ्यास करण्याकरिता गावनिहाय मतदारांची आकडेवारी वाचकांसाठी बारामती झटका यांचेकडून प्रसारित करण्यात येत आहे.

आनंदनगर 12, बचेरी 11, बागेचीवाडी 12, बाभुळगाव 9, बोरगाव 14, बोंडले 9, बिजवडी 7, बांगर्डे 9, भांब 9, भांबुर्डी 13, चाकोरे प्रतापनगर 11, चौंडेश्ररवाडी 14, चांदापुरी 18, दसूर 8, दहिगाव 18, देशमुखवाडी 10, धर्मपुरी 14, धानोरे 10, डोंबाळवाडी कुरबावी 10, डोंबाळवाडी खुडूस 7, एकशिव 11, गणेशगाव 7, मगरवाडी 11, गोरडवाडी 11, गुरसाळे 14, गिरवी 11, गिरझणी 11, हनुमानवाडी 8, इस्लामपूर 12, जळभावी 9, जाधववाडी 10, जांबुड 14, कदमवाडी 8, कचरेवाडी 10, कन्हेर 11, काळमवाडी 10, कोंढारपट्टा 8, कोथळे 9, कोळेगाव 14, कुसमोड 9, कुरभावी 9, कोंडबावी 11, कळंबोली 7, कारूंडे 11, खळवे 9, खुडूस 16, खंडाळी दत्तनगर 18, लवंग 14, लोंढे मोहितेवाडी 8, लोणंद 9, मळोली 15, माणकी 9, माळखांबी 9, माळीनगर 18, मारकडवाडी 12, माळेवाडी बोरगाव 8, मेडद 14, मोटेवाडी माळशिरस 10, मोरोची 13, मिरे 8, मांडवे 17, नेवरे 10, निमगाव मगराचे 18, पळसमंडळ 10, पठाणवस्ती 10, पानिव 12, पुरंदावडे 12, पिरळे 11, पिलीव 18, पिसेवाडी 12, पिंपरी 11, फळवणी 12, फडतरी 11, फोंडशिरस 17, रेडे 11, सदाशिवनगर 12, सवतगव्हाण 10, सुळेवाडी 10, संगम 10, संग्रामनगर 15, शिंदेवाडी 11, शेंडीचिंच 7, शिंगोर्णी 11, तरंगफळ 10, तामशीदवाडी 12, तोंडले 9, तिरवंडी 12, तांदुळवाडी 17, तांबवे 11, तांबेवाडी 8, उघडेवाडी 12, उंबरे दहिगाव 10, उंबरे वेळापूर 9, वाघोली 11, वाफेगाव 10, वेळापूर 18, विजयवाडी 9, विठ्ठलवाडी 7, विझोरी 11, यशवंतनगर 18, येळीव 7, झिंजेवाडी खुडूस 9, झिंजेवस्ती 9 अशी 103 गावातील 1151 मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button