नातेपुते येथे शिवजयंती निमित्त शिवव्याख्यानमालाचे आयोजन
संग्रामनगर (बारामती झटका) संजय लोहकरे यांजकडून
नातेपुते येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपारिक जयंतीच्या निमित्ताने दि. १९ ते २२ एप्रिल या कालावधीत शिव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. या व्याख्यानमालेचे आयोजन १९८२ पासून केले जात आहे.
बुधवार दि. १९ एप्रिल रोजी सामाजिक समरसता मंचचे प्रमुख व भटक्या विमुक्त विकास कल्याण बोर्ड (भारत सरकार) अध्यक्ष भिकुजी तथा दादाजी इदाते यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नागरी सत्कार व त्यानंतर श्री. इदाते यांचे व्याख्यान होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार व सेवाव्रती डॉ. एम. पी. मोरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे.
गुरुवार दि. २० एप्रिल रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांचे आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण क्षेत्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथराव कवितके राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. रामहरी रुपनवर व सपोनि प्रवीण संपांगे हे राहणार आहेत.

शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी सुरेश पवार यांचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी धुळदेव पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. डी. एन. काळे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून समता परिवाराचे नेते ॲड. बी. वाय. राऊत राहणार आहेत.
वरील सर्व कार्यक्रम जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहेत.
शनिवारी दि. २२ रोजी सकाळी ८.३० वा. शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर व सर्व नगरसेवकांच्या हस्ते होणार असून इतिहासाचे अभ्यासक प्रशांत सरुडकर यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या व्याख्यानमालेचा लाभ आबाल वृद्धांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng