प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या आदेशाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ज्योतीताई शिंदे यांची निवड
करमाळा (बारामती झटका)
शिवसेना महिला आघाडी माढा विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शिवम फाउंडेशन जेऊर च्या संस्थापक अध्यक्षा ज्योतीताई शिंदे यांची निवड शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी जाहीर केली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल कानगुडे, उपतालुका प्रमुख लखन शिंदे, कार्याध्यक्ष सुधीर आवटे, प्रसिद्ध व्यापारी जोशी गादिया सेठ आदींच्या उपस्थित देण्यात आले. तसेच यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.
ज्योतीताई शिंदे यांचे बचत गटाच्या माध्यमातून मजबूत संघटन आहे. विशेषत: बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांना बांधकाम कामगार नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळवून देण्यात त्या अग्रेसर आहेत. त्यांनी ३०० बांधकाम महिला कामगारांची नोंदणी केली असून यापैकी १४५ महिलांना याचा आता लाभ मिळू लागला आहे.
बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने नोंदणी केल्यानंतर पाच हजार रुपयांचे सामान दिले जाते. मुलांना शिष्यवृत्ती राहण्यासाठी घरकुल कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास मोफत उपचारासह २८ फायदे या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या संघटित कामगारांना दिले जातात.
यावेळी बोलताना ज्योतीताई शिंदे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील सर्व महिलांना संघटित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा देण्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत देऊन महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान एकनाथ शिंदे यांनी केला आहे. घरेलू कामगार महिला, दुकानात रोजंदारीने काम करणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रात रोजंदारीने काम करणाऱ्या महिला, शेतात रोजंदारी काम करणाऱ्या महिला या सर्वांना संघटित करून मोठा मेळावा घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
करमाळा तालुक्यातील बांधकाम, धुणी-भांडी करणाऱ्या महिला, शेतात काम करणाऱ्या, खाजगी दुकानदारात रोजंदारीने काम करणाऱ्या महिला या सर्व महिलांचे संघटन करण्यासाठी सर्व कामगारांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी मिळावे घेणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng