अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या घोडेबाजारात बोकडाची किंमत करणार….
लक्ष्मी दर्शनामुळे माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात मात्र, ठराविक घरात दिवाळी साजरी होणार…
माळशिरस (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रंगतदार व चुरशीच्या निवडणुकीत मतदारांचा घोडेबाजार होणार मात्र, किंमत बोकडाच्या किमतीएवढी नेते व कार्यकर्ते करतील, अशी चर्चा आहे. लक्ष्मी दर्शनामुळे माळशिरस तालुक्यात प्रत्येक गावात मात्र ठराविक घरात दिवाळी साजरी होणार आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील व समविचारी फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, के. के. पाटील यांनी सत्ताधारी यांना मोठे आवाहन उभे केलेले आहे. ग्रामपंचायत मतदार संघ व सहकारी संस्था मतदार संघातील मतदारांचा घोडेबाजार होण्याची राजकीय वर्तुळामध्ये शक्यता व्यक्त केली जात आहे. चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये मतदारांना आकर्षित करण्याकरता लक्ष्मी दर्शन घडवावे लागणार आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य व सहकारी सेवा संस्थेचे संचालक आहेत. त्यामुळे ठराविक घरामध्ये लक्ष्मीचे दर्शन होऊन दिवाळी साजरी होणार आहे. मतदार गावामध्ये निवडणुकीत काही बिनविरोध झालेली आहेत तर काही निवडणुकीत लाखो रुपये खर्च करून निवडून आलेले आहेत. तालुक्यामध्ये मोहिते पाटील समर्थक व मोहिते पाटील विरोधक असे राजकीय समीकरण असते मात्र, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे.
निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्हीकडूनही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शेवटी निष्ठा, प्रेम, पार्टी, नेता यापेक्षा लक्ष्मी दर्शन महत्त्वाचे ठरेल, असे मतदारांमधून बोलले जात आहे. नेत्यांच्या राजकीय घोडेबाजारात किंमत मात्र, बोकडाला जेवढे पैसे असतात तेवढीच केलेली असल्याची चर्चा सुद्धा मतदारांमधून सुरु आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng