सोसायटीच्या सेक्रेटरींना निवडणूक काळात घरी बोलावणे आचारसंहितेचा भंग होतोय – मधुकर पाटील..
सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बेकायदेशीर मीटिंगकडे लक्ष देण्याची गरज
फोंडशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची निवडणूक सुरू आहे. अशा निवडणुकीच्या काळात विकास सेवा सोसायटीचे सेक्रेटरी यांना नेत्यांनी बंगल्यावर अथवा घरी बोलावणे, आचारसंहितेचा भंग होतोय. याकडे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधक जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बेकायदेशीर मीटिंगकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य फोंडशिरस पंचक्रोशीचे नेते मधुकर वाघमोडे पाटील यांनी बारामती झटक्याशी बोलताना मत व्यक्त केलेले आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा निवडणुकीच्या व आचारसंहितेच्या वेळी कोणीही विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सेक्रेटरी अथवा कर्मचारी कोणाच्याही घरी अथवा बंगल्यावर बोलावणे बेकायदेशीर आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याचे मत व्यक्त करून जर बेकायदेशीर पद्धतीने सेक्रेटरी यांना उद्या सकाळी दहा वाजता एकत्रित बोलावून घेणार असतील तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधितावर आचारसंहितेचा गुन्हा नोंद करावा. अन्यथा याचे पडसाद तीव्र उमटले जातील असा सहकारी सेवा सोसायटीचे हिंदकेसरी मधुकर वाघमोडे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng