माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंजावाती दौऱ्याचे आयोजन.
पद्मजादेवी मोहिते पाटील, अजित बोरकर, पांडुरंग वाघमोडे, पांडुरंग पिसे, भीमराव फुले, सोनाली पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा झंजावाती प्रचार दौरा
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक 2023 या निवडणुकीच्या प्रचारार्थ माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंजावाती दौऱ्याचे आयोजन मंगळवार दि. 25/04/2023 रोजी 09 ते 08 या वेळेत करण्यात आले आहे. सदरच्या दौऱ्यात उमेदवार पद्मजादेवी मोहिते पाटील, श्री. अजित बोरकर, श्री. पांडुरंग वाघमोडे, श्री. पांडुरंग पिसे, श्री. भीमराव फुले, सौ. सुनीता पाटील यांच्या समवेत फत्तेसिंह माने पाटील, मच्छिंद्रआबा ठवरे, रणजीतसिंह जाधव, आरिफभाई पठाण, किरण पाटील, भजनदास चोरमले, शामतात्या मदने, नागेश काकडे, महावीर धायगुडे, बाबासाहेब माने, किरण साठे, ॲड. वीरेंद्र वाघमारे, मदनसिंह जाधव, अमोल मदने, संग्राम पाटील, ॲड. धनंजय दुपडे, ॲड. डोंगरे, सोमनाथ पिसे, कुंडलिकराजे मगर, साहिल आतार, अजित कोडग, खंडूतात्या कळसुले आदी मान्यवर सोबत राहणार आहेत.

सकाळी 09 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असून खुडूस, डोंबाळवाडी, झंजेवाडी, मोटेवाडी, तरंगफळ, पठाणवस्ती, चांदापुरी, निमगाव, झिंजेवस्ती, कुसमोड काळमवाडी, पिलीव/झुलेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, तांदूळवाडी, मळोली असे झंझावाती दौऱ्याचे नियोजन ठरलेले असून सदरच्या दौऱ्याचे डॉ. तुकाराम ठवरे खुडूस व शशिकांत कदम तांदूळवाडी यांच्याकडे नियोजन आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng