Uncategorized

माळशिरसमध्ये राहुल “भेळ” वरच चालतो दत्ताभाऊ यांच्या प्रपंचाचा “खेळ”


३५ वर्षात खाणाऱ्यांची जीभ बदलली मात्र, राहुल भेळची चव बदलली नाही..

चवीने खाणार त्याला क्षीरसागर परिवार आवडीने देणार..

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस शहरात दत्ताभाऊ क्षीरसागर परिवाराने गेल्या ३५ वर्षापासून राहुल भेळ व भत्ता व्यवसाय सुरू केलेला आहे. ३५ वर्षात भेळ खाणाऱ्या अनेक ग्राहकांच्या जीभ बदलली मात्र, राहुल भेळची चव बदलली नाही. चवीने खाणार त्याला क्षीरसागर परिवार आवडीने देणार. ग्राहक हीच देवता म्हणून माळशिरसमध्ये क्षीरसागर परिवार यांचा राहुल “भेळ” वरच चालतं प्रपंचाचा ” खेळ”, असे उद्योग व्यवसायात स्वतःचे नाव करणारे क्षीरसागर परिवार माळशिरस नगर पंचायत हद्दीमध्ये राहत आहे.
दत्ताभाऊ क्षीरसागर यांचे मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील जळकोट हे आहे. ते ३५ वर्षांपूर्वी उद्योग व्यवसायानिमित्त माळशिरस शहरात आलेले होते. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून लिहिता वाचता यावे, व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे एवढ्या पुरते होते. त्यांनी “राहुल भेळ व भत्ता” हा व्यवसाय सुरू केलेला होता. त्यांना पहिल्यापासून धर्मपत्नी सौ. रेखाबाई क्षिरसागर यांची मोलाची साथ मिळत आहे. क्षीरसागर दांपत्य यांना दोन मुले एक मुलगी आहे. सर्व विवाहित असून नातवंडे झालेली आहे.

क्षीरसागर परिवार यांचे माळशिरसमध्ये दोन व अकलूज येथे एक भेळ व भत्ता दुकान राहुल या नावाने सुरू आहे. भेळ व भत्त्याबरोबर खारे शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे, शेवचिवडा व पापडी होलसेल दरात विक्री केली जाते. भेळ बनवण्याची पद्धत अनोखी असल्याने चव वेगळीच लागत असल्याने असंख्य ग्राहक खास आवर्जून राहुल भेळ व भत्ता खाण्याकरिता येत असतात.

मांडकी गावचे माजी सरपंच व वस्ताद तानाजीराव रणवरे सर, गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन खंडूतात्या कळसुले (पवार) व त्यांचे सहकारी कायम भेळ व भत्ता आवडीने खात असतात. असे कितीतरी असंख्य ग्राहक खाणाऱ्या ग्राहकांची जीभ बदलली मात्र, राहुल भेळची चव बदलली नाही. चवीने खाणार त्याला क्षीरसागर परिवार आवडीने देणार, सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणूक देऊन गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवलेला असल्याने दिवसेंदिवस राहुल भेळ व भत्ता यांचा बोलबाला खवय्यांमध्ये सुरू आहे.

क्षीरसागर परिवार यांचे तीन ठिकाणी व्यवसाय सुरू असून सर्व घरातील महिला व पुरुष मंडळी एक दिलाने मिळून मिसळून व्यवसाय करीत आहेत. दिवसेंदिवस उत्तरोउत्तर आर्थिक प्रगती करून परिवाराने माळशिरसह स्वतःची जागा घेऊन घर उभारून व्यवसाय सुरू आहे. पस्तीस वर्षांपूर्वी दत्ताभाऊ यांचे मित्रपरिवार यांच्याशी सलोख्याचे व मैत्रीचे संबंध होते. ते आजसुद्धा सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button