रयत शिक्षण संस्थेच्या पिलीव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, पालकवर्गात समाधानाचे वातावरण….
अभिनंदनाची बातमी…. आनंदाचा उत्सव NMMS परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा लक्षवेधी निकाल.
पिलीव ( बारामती झटका )
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सन 2022-23 NMMS परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे.
सदर परीक्षेला प्रविष्ट एकूण विद्यार्थी 93, परीक्षेत पात्र विद्यार्थी 56, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी 15, सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी 3.15 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मिळणार प्रति विद्यार्थी 60000/- रुपये प्रमाणे नऊ लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथी शिष्यवृत्ती पात्र तीन विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 1,15,200/- रुपये असे एकूण 10,15,200/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा कायम राखणारे सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक विद्यालयाचे सर्व स्टाफ यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन होत आहे.
वर्षभर प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीमती जरे आर. एम.(बुद्धिमत्ता, विज्ञान), श्रीमती कुलकर्णी ए. ए. (गणित), श्रीमती घोडके मॅडम, श्री. झाडे सर, श्री. मेटकरी सर (समाजशास्त्र) यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव श्री. विठ्ठल शिवणकर साहेब, विभागीय चेअरमन श्री. संजीव कुमार पाटील साहेब, सहसचिव श्री. राजेंद्र साळुंखे साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. गोडसे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री. कापसे साहेब, पर्यवेक्षिका श्रीमती मोरे मॅडम, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. पाटील एस. एस. सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. देशमुख साहेब, केंद्रप्रमुख श्री. फासे सर, पिलीवचे सरपंच श्री. नितीन माळी तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, श्री. संग्रामसिंह जहागीरदार साहेब, माजी शिक्षण संचालक श्री. जरग साहेब, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, आजी-माजी विद्यार्थी, व पिलीव पंचक्रोशीतील नागरिक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng