महिलांच्या अभुतपुर्व गर्दीमध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात
अकलूज (बारामती झटका)
महिलांच्या अभुतपुर्व गर्दीने खचाखच भरलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलावर ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेस दिमाखात सुरुवात झाली. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या येवढ्या महिला पाहुन उपस्थित मान्यवरांनी ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेच्या प्रमुख शितलदेवी मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांचे कौतूक केले. उपस्थित सर्व मान्यवर, प्रेक्षकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेतर्फे मनःपुर्वक स्वागत अशी प्रस्तावना करत शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, पुर्वीपासून कुस्ती हा पुरुषांचा खेळ अशी सर्वत्र मान्यता होती. परंतु महिलांनी या खेळात येऊन मैदाने गाजवायला सुरूवात केली आणि आम्हीही काही कमी नाही आहोत हे सिध्द केले. कुस्ती हा शक्ती आणी युक्तीचा खेळ. गत अनेक वर्षांपासून आम्ही महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मागणी करत होतो. काही अज्ञात कारणास्तव आम्हाला ती परवानगी न मिळाल्याने आम्ही ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.


अशा स्पर्धा जिंकणाऱ्या महिला मल्लांना शासकीय नोकरीत समाविष्ठ करून घेण्यात यावे यासाठी आता आमचा पुढील लढा राहील असे त्यांनी सांगितले. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदिनीदेवी मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संजिवराजे नाईक निंबाळकर, सविताराजे भोसले, नारायण आबा पाटील, हिंदकेसरी अमोल पराडे, सुरज ठवरे, शिवाजी कांबळे, प्रमोद पाटील, अजित तळेकर, अतुल पाटील व मोहिते-पाटील परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले..


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आयोजित केलेली ही कुस्ती स्पर्धा म्हणजे मुली व महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या माझ्या शुभेच्छा आहेत. स्वराज्याच्या महाराणी ताराराणी यांनी शक्ती आणी युक्तीने मोगलांना नामोहरम केले. कुस्ती हा खेळही शक्ती आणी युक्तीचा आहे. महिला पालकांनी आपल्या मुलींना या खेळाची आवड निर्माण करून द्यावी.



सलामीचा सामना नंदिनीदेवी मोहिते-पाटील, उर्मिलादेवी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते लावण्यात आला. मैदान क्र. १ वरती निशा रायगडकर – रायगड विरुध्द साक्षी भुमकर-पुणे व मैदान क्र. २ वरती सिध्दी खोपडे ठाणे विरूध्द सिध्दी पाटील-रायगड यांच्यात खेळवण्यात आला.
कार्यक्रमातील सर्व फोटो छायाचित्रकार रविराज वाणी, माळशिरस यांनी टिपलेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng