मोहिते पाटील यांचा भाजपच्या धावपट्टीवरील गुगली चेंडू वाईड जाऊन मोकळ्यात अवांतर धावेची भर पडली.
भाजपचे खासदार व आमदार लोकप्रतिनिधी यांना वगळले असल्याने भाजपच्या नेत्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
अकलूज ( बारामती झटका )
मोहिते पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना अनेक वेळा गुगली चेंडूमध्ये अनेक नेते व कार्यकर्त्यांना आऊट केलेले होते. मात्र, मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या धावपट्टीवरील नेहमीप्रमाणे टाकलेला गुगली चेंडू वाईड जाऊन मोकळ्यात अवांतर धावेची भर पडून एक चेंडू वाढलेला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी महिला केसरी 2023 मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांना उद्घाटन समारंभाच्या पत्रिकेमध्ये वगळलेले असल्याने उद्घाटन समारंभाच्या पत्रिकेमधील अनेक नेते व कार्यकर्ते भाजपचे व भाजपच्या संलग्न असणाऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे. कार्यक्रम पत्रिकेमधील भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार महेश लांडगे, आमदार रमेश कराड, माजी आमदार प्रशांतमालक परिचारक, काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे, आमदार सुभाषबापू देशमुख यांचे चिरंजीव मनीष सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण विजयकुमार देशमुख, दिग्विजय दिगंबर बागल, गिरीराज सावंत, संजय अवताडे, समाधान काळे, शेकापचे बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे बाळराजे राजन पाटील यांच्यासह अनेकांनी ताराराणी महिला केसरी स्पर्धेला राजकीय झालर तयार झाल्याने पाठ फिरवली. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील यांच्यासह ठराविक नेते कार्यक्रम पत्रिकेमधील उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजनामध्ये भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील होते. सध्या दोन्हीही नेते भाजपमध्ये आहेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. यामध्ये व्यक्तीपेक्षा पदाला महत्त्व दिले जाते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदापेक्षा व्यक्तीला महत्त्व दिले जाते, त्यामुळे मोहिते पाटील काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना अनेक कार्यक्रम करून जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील वेगवेगळ्या पक्षातील नेते व कार्यकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणून कार्यक्रम केलेले आहेत. याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात सर्व नेते व युवा कार्यकर्ते आम्ही एकत्र करू शकतो, असा आत्मविश्वास असावा. मात्र भारतीय जनता पार्टीच्या धावपट्टीवर मोहिते पाटील यांचा गुगली चेंडू वाईड जाऊन मोकळ्यात अवांतर धावेची भर पडलेली आहे, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आणि मोहिते पाटील परिवारांचे जरी अंतर्गत मतभेद असतील तरी सार्वजनिक कार्यक्रमात चव्हाट्यावर दिसलेले आहेत. माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव असणे गरजेचे होते. याचाच फटका प्रोटोकॉल न पाळल्याने भाजपच्या व भाजप संलग्न असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी मोहिते पाटील जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर आणू शकतो, याला छेद बसलेला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wonderful analysis! Your insights are very enlightening. For more detailed information, check out: DISCOVER MORE. Keen to hear your views!