Uncategorized

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सदैव पाठीशी असणारी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील जोडगोळी..


डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सुख-दुःखात व राजकीय चढ-उतारामध्ये कायम सोबत राहणारे निष्ठावानपैकी ज्येष्ठ नेते व युवा नेत्याचा समावेश…

सदाशिवनगर ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील या परिवाराच्या सुखदुःखात व राजकीय चढउतारामध्ये राहणारे निष्ठावानपैकी येळीव गावचे ज्येष्ठ नेते गुलाबराव निंबाळकर व जाधववाडी गावचे युवा नेते दादासाहेब जाधव या दोन माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील जोडगोळी सदैव पाठीशी राहत असते. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गुलाबराव निंबाळकर, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ‘दादा, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, असाच संदेश देत आहेत.

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील व युवकांचा बुलंद आवाज डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सुरू असताना अनेक लोकांचे जीवनमान व प्रपंचाची घडी बसवलेली आहे. पप्पासाहेब व धवलदादा यांचा चांगला काळ असताना अनेकांनी कोपरापर्यंत वगूळ येईपर्यंत मांडीला मांडी लावून खाल्लेले आहे. राजकारणात चढ-उतार होत असतो. अडचणीच्या काळात अनेक खाणारे लोक प्रतापगडाच्या मोहिते पाटील परिवारांना विसरलेले आहेत. खाल्ल्या मिठाला जागलेले नाही, मात्र येळीवचे गुलाबराव निंबाळकर व जाधववाडीचे दादासाहेब जाधव यांनी कधीही प्रतापगडाची साथ सोडलेली नाही. सुखदुःखामध्ये कायम सोबत राहून राजकारणातील चढउतार असताना सुद्धा कायम सोबत राहिले आहेत. राजीव गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा ही जोडगोळी सहभागी झालेली होती. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांमधून “दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल”, याप्रमाणे भविष्यात निश्चित जिगरबाज व लढवय्या धवलदाद यांचा दिवस उगवणार आहे, असा अशावाद निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. म्हणून निस्वार्थीपणे अनेक कार्यकर्ते धवलदादांवर प्रेम करीत आहेत. त्यापैकी जेष्ठ नेते गुलाबराव निंबाळकर व युवा नेते दादा जाधवराव जोडगोळी कायम सोबत असतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button