कै. नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
कै. नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. ११ मे २०२३ ते मंगळवार दि. १६ मे २०२३ या दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भव्य संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन कर्णवर पाटीलवस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यामध्ये कथाकार ह.भ.प. स्वामीराज महाराज भिसे हे असणार आहे. तसेच दि. १७ मे २०२३ रोजी सकाळी ९ वा. भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन समस्त कर्णवर पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
गुरुवार दि. ११ मे २०२३ रोजी दुपारी १२.११ ते १.११ दरम्यान श्री ग्रंथ पूजन, दुपारी १.३० ते सायं. ६ वाजेपर्यंत भोजन असणार आहे.
बुधवार दि. १७/०५/२०२३ रोजी सकाळी ९ वा. वृक्षारोपण, रक्तदान व सर्व रोग निदान शिबिर संपन्न होणार आहे. तसेच सकाळी १० वा. अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका माळशिरसचे कोषाध्यक्ष ह. भ. प. संजय महाराज पाटील धर्मपुरी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. दुपारी १२.११ वा. पुष्पांजली व आरती होणार आहे. त्यानंतर दु. १२.३० ते ३ वाजेपर्यंत भोजन असणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे व रक्तदान करण्याचे आवाहन श्री श्री सद्गुरु साखर कारखाना लिमिटेड श्रीश्रीनगर राजेवाडी चे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, अधिकारी व कामगार वर्ग तसेच समस्त कर्णवर पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng