Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

माळशिरस येथील साई ॲग्रोचे मालक आशिष अनिलकुमार लोखंडे यांच्यावर युरिया खताची तक्रार दाखल…

अकलूज पोलीस स्टेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत 225 युरिया बॅग जप्त करून तीन आरोपींवर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथील साई ॲग्रोचे मालक आशिष अनिलकुमार लोखंडे रा. माळशिरस, युरिया खत खरेदीदार नवशाद इम्राहीम मुजावर पिराची कुरवली, ता. पंढरपूर, वाहन मालक सोमनाथ ज्ञानोबा बनसोडे रा. वेळापूर, ता. माळशिरस, या तिघांवर अकलूज पोलीस स्टेशन येथे खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 5, 25 (1)(2)(3) 35( 1) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 चे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करून शेती उपयोगी युरिया अन्य औद्योगिक कारणासाठी किंवा कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी वाहन क्रमांक ट्रक नंबर एम.एच. 42 क्यू 1681 या वाहनातून घेऊन जात असताना अकलूज पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशन येथे ठेवल्यानंतर सदरच्या युरियाची खातरजमा करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीमधील कृषी विभागात खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी श्री. नितीन हरिदास चव्हाण, रा. वाघोली, ता. माळशिरस, यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.

घडलेली हकीगत अशी, दि. 18/5/2023 रोजी अकलूज पोलीस स्टेशन यांनी फोनद्वारे कृषी विभागाला माळशिरस रोडवर पाटील वस्ती येथे सदरचे वाहन विना पावती खत विक्रीसाठी घेऊन जाताना मिळून आल्याने सदरचे वाहन पोलीस ठाण्यास आणून लावलेले होते. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये युरिया माल भरलेला ट्रक वाहन चालक शाहीर दादासो काझी, रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर, व वाहन मालक सोमनाथ बनसोडे रा. वेळापूर सदरचे वेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता हा युरिया माल साई ॲग्रो माळशिरस यांच्याकडून आणलेला आहे. असे सांगितल्यानंतर श्री. नितीन चव्हाण व खत निरीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर शिवाजी रमण शिंदे या दोघांनी साई ॲग्रो माळशिरस येथे येऊन गोडाऊन तपासणी केली. त्यांनी 255 युरिया बॅग दिले असल्याचे सांगितले. स्टॉक रजिस्टर व गोडाऊन मधील साठा तपासणी केला असता बरोबर असल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर पंचांच्या समक्ष पोलीस ठाणे येथे ट्रक मधील आरसीएफ कंपनीचा 45 किलोच्या 225 एरिया बॅग एकूण वजन 11. 475 मेट्रिक टन होते. युरिया बॅग वरील तपशील व साई ॲग्रो यांचे गोडाऊन मधील युरिया बॅग वरील तपशील एकसारखाच दिसून आलेला होता. सदरचा युरिया साई ॲग्रो माळशिरस या विक्रेत्याकडीलच असल्याची खात्री झाल्यानंतर सदरच्या बॅग मधील 500 ग्रॅम वजनाचे तीन प्रतीमध्ये तपासणी करिता सॅम्पल काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने अकलूज पोलीस स्टेशन व कृषी विभाग यांनी संयुक्त कारवाई करून युरिया खत विक्रेता, युरिया खत खरेदीदार व वाहन मालक यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
00:21