अकलूज येथील अध्यापक विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. अरूणादेवी देसाई अध्यापक विद्यालयातील साल २००९-१० वर्षातील माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिकांचा स्नेहमेळावा रविवार दि. २१/०५/२०२३ रोजी माळेवाडी अकलूज येथे उत्साहात पार पडला.
यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील माजी छात्र अध्यापक यांनी विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी या बॅचमधील सध्या जिल्हा परिषद नियुक्त, शासकीय विभागांमध्ये सेवा बजावणारे, व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी यांचा गुणगौरव करण्यात आला.


सदर कार्यक्रमासाठी माजी छात्र अध्यापक जुल्कर शेख यांनी सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून गोपाळ लावंड, सोनाली जगताप, गोविंद पवार, प्रदीप मिसाळ यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे यांनी केले तर आभार संदीप थोरात यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
