परमहंस यात्रा कंपनीने दृष्टी नसलेल्या भाविकांना बाबा केदारनाथचे दर्शन घडवले
अकोला (बारामती झटका)
उत्तराखंड देवभूमीमध्ये स्थित असलेले गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ चारधाम यात्रा करण्याकरता देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनाला जातात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील कमल किशोरजी लाटा यांची दृष्टी गेली. पण, बाबा केदारनाथ, बद्रीनाथ दर्शनाची अभिलाषा मनामध्ये होती आणि म्हणून आंतरराष्ट्रीय यात्रा नियोजनामध्ये नावलौकिक झालेल्या परमहंस यात्रा कंपनीचे संचालक ह. भ. प. श्री. गणेश महाराज शेटे यांच्याशी कमल किशोर लाटा यांनी संपर्क साधला व मला आपल्या सोबत उत्तराखंड चारधाम यात्रेला यायचे आहे पण, मला अजिबात दिसत नाही. कृपया माझे दर्शन घडवून द्यावे, ही विनवणी केली असता यात्रेमध्ये त्यांना सहभागी करण्यात आले.
गंगोत्री, यमनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ या चारही धामाला मंदिरातील विश्वस्तांशी संपर्क साधून थेट व्हीआयपी गेटमधून कमल किशोरजी लाटा यांचे सहकुटुंब दर्शन घडवून दिले. यावेळी कमल किशोरजी लाटा यांना विचारण्यात आले, आपण एवढ्या दूर आलात, अवघड अशी यात्रा आपण करत आहात पण, आपल्याला इथे आल्यानंतर देव दिसणार नाही. तर त्यांचे उत्तर असे मिळाले मला जरी देव दिसत नसला पण मी इथे आलेलो आहे हे मात्र देवाला दिसणार आहे. हा भाव मनात ठेवून एवढ्या दूर महाराष्ट्रातील एक भाविक पोहोचला. उत्तराखंड येथील सर्व देवस्थानांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. मनात जर दृढनिश्चय असला तर कुठलेही कार्य अशक्य नाही हे, या बाबींवरुन सिद्ध होते, अशी माहीती परमहंस यात्रा कंपनीचे संचालक ह. भ. प. श्री. गणेश महाराज शेटे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great job on this article! It was very engaging and informative. I’m eager to hear different viewpoints on this. Click on my nickname for more engaging content.