वादळी वाऱ्याने घराची भिंत पडून माळशिरस तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू…
दोन्ही डोळ्याने अंध असणाऱ्या श्रीमती कल्पना सरतापे यांना दुर्दैवी मृत्यू येईल याची कल्पना सुद्धा नव्हती, परिसरात हळहळ…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती गावातील दबासेवस्ती येथील श्रीमती कल्पना गौतम सरतापे यांचा वयाच्या ५७ व्या वर्षी वादळी वाऱ्याने घराची भिंत अंगावर पडून जागीच मृत्यू झालेला आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या श्रीमती कल्पना सरतापे यांना दुर्दैवी मृत्यू येईल याची कल्पना सुद्धा नव्हती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. श्रीमती कल्पना सरतापे या दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचे पती गौतम सरतापे यांचे दुःखद निधन झालेले आहे. कालकथीत गौतम सरतापे यांना दोन्ही पायाने चालता येत नव्हते, ते दिव्यांग होते.
रोहिणी नक्षत्र निघालेले असल्याने गाडागुड सुरू झालेली होती. अंध असलेल्या श्रीमती कल्पना सरतापे घराच्या भिंतीला टेकून बसलेल्या होत्या. पठाणवस्ती परिसरात दुपारी जोराचा सुसाट वारा सुटलेला होता. वाऱ्याच्या वेगाने घराची भिंत अंगावर पडून त्या जागीच मृत्यू पावलेल्या आहेत. परिसरामध्ये त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शासनाने सरतापे परिवार यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे. आई-वडील नसलेली, एक मुलगी लग्नाची अजून शिल्लक राहिलेली आहे, त्या मुलीच्या लग्नाकरिता तरी आर्थिक मदत व्हावी. श्रीमती कल्पना सरतापे यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व सरतापे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng