Uncategorized

“द ग्रेट भेट” किडनी दान देऊन भावाला “जीवदान” देणाऱ्या बहिणीची “योगदान” असणाऱ्या भावाशी भेट झाली….

भावाला दिर्घायुष्य लाभण्यासाठी बहिणीने स्वतःची किडनी दान करून भाऊ-बहिणीचे जपले नाते.

माळशिरस (बारामती झटका)

भावाला स्वतःची किडनी दान देऊन जीवदान देणाऱ्या बहिणीचे ऑपरेशनमध्ये योगदान असणारा भाऊ माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांची आणि संगीता कोळेकर यांची “द ग्रेट भेट” झाली. चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता. यावेळी माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक लक्ष्मणतात्या पवार, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन संघाचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सरगर, माळशिरसचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास काळे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक नामदेवराव ठवरे, डोंबाळवाडीचे माजी सरपंच तुकाराम ठवरे, भाजपचे युवा नेते डॉ. अक्षय वाईकर, लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे यांच्यासह वीरकर व कोळेकर यांचे नातेवाईक व कचरेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

भाऊ व बहीणीचे एक अतूट नाते असते, याची प्रचिती माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावातील प्रतापनगर येथे आली आहे. येथील अंगणवाडी सेविका संगीता कोळेकर यांनी आपल्या लहान भावाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे आपली एक किडनी भावाला दान करून बहिणीचे कर्तव्य निभावले आहे. पुणे येथील जहाँगीर हाॅस्पीटल या ठिकाणी या दोघांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.

पुणे येथे मॅकेनिकल इंजिनिअर असलेला धाकटा भाऊ म्हाकू मारूती विरकर (वय ३२) यांच्या दोन्हीही किडन्या लहान वयातच खराब झाल्यामुळे त्याला एका किडनीची अत्यंत आवश्यकता होती. अंगणवाडी सेविका असलेल्या संगीता कोळेकर (वय ४२) यांनी वेळेचा विलंब न करता त्यांनी आपली एक किडनी भावाला देवून एका बहिणेचे कर्तव्य तर पार पडलेच पण त्याचबरोबर भावाचा जीव वाचवला आहे. भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणीने दातृत्वाचे काम केले आहे.

श्रीमती संगीता कोळेकर या गेली २५ वर्ष चाकोरे येथील अंगणवाडीत सेविका पदावर कार्यरत आहेत. दहा वर्षापुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले असून त्यादिवसापासून त्या एकट्या व त्यांच्या सासू संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीनही मुलींनी कृषी महाविद्यालयाची पदवी प्राप्त केली आहे. श्रीमती कोळेकर यांचा भावाला किडनी दिल्यामुळे आनंद गगनात मावेनासा तर झालाच पण आई वडिलांच्या चेह-यावरच्या आनंदाने त्या खूप समाधानी होत्या. मात्र ऑपरेशन करण्यामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण योगदान असणारे आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांची भेट झालेली नव्हती. आमदार यांचे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला मदत करणारे असे ऐकून होते. परंतु, प्रत्यक्ष भेटण्याचा योग आल्याने “द ग्रेट भेट” या उक्तीचा प्रत्यय आलेला आहे. वीरकर परिवारातील लहान थोर मंडळींनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे जंगी स्वागत करून स्नेह भोजनाचा आस्वाद दिलेला आहे.

लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी ऑपरेशनच्या वेळी आर्थिक अडचण असताना मोफत ऑपरेशन करून केलेली मदतीची कृतज्ञता कोळेकर व वीरकर परिवार यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button