Uncategorized

माळशिरस नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी धनाजी देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्यावर असलेल्या निष्ठेचे फळ वडार समाजाला मिळालेले आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीत स्विकृत नगरसेवक म्हणुन भारतीय जनता पार्टीचे धनाजी बबन देवकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी नामदेवजी टिळेकर साहेब यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, मुख्याधिकारी नितीनजी गाढवे साहेब, भाग्यश्री बेडगे मॅडम, उपनगराध्यक्ष वळकुंदे, नगरसेवक विजय देशमुख, शिवाजीराव देशमुख, रघुनाथ चव्हाण, महादेव कोळेकर, जगन्नाथ गेजगे, दादासाहेब शिंदे, कैलास वामन, सचिन वावरे, रणजित ओहोळ, वैभव जानकर, प्रवीण केमकर, यांच्यासह रावसाहेब देशमुख, संजय गायकवाड, दिपक मंजुळे, सागर धाईंजे, पप्पु देवकर, विकास लष्करे आदींसह माळशिरस शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपंचायत कर्मचारीवर्ग व पत्रकार मित्र उपस्थित होते.

वडार समाजाला आतापर्यंत ग्रामपंचायत काळापासून ते आतापर्यंत कधीच समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. पण ती संधी भारतीय जनता पार्टीने विजयसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते, नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून संधी मिळाली. वडार समाज हा माळशिरसमध्ये मोठ्या संख्येने आहे. ह्या निवडीने समाजामधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्यावर निष्ठा व प्रेम आहे. पहिल्यापासून धनाजी देवकर यांनी वडार समाजातील युवकांनी राजकारणापलीकडे संबंध ठेवलेले आहेत. कायम डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची सावली म्हणून धनाजी देवकर कायम सुख दुःखात सोबत असल्याने खऱ्या अर्थाने निष्ठेला फळ मिळालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button