मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर, जनतेचे आरोग्य धोक्यात
संबंधितांवर गुन्हे दाखल करा, शिवसेनेचे मागणी
करमाळा (बारामती झटका)
सध्या मच्छीमारांकडून मासे पकडण्यासाठी शेत, तलाव व मोठमोठ्या धरणात, पाझर तलावात क्लोरोपायरीफॉस तसेच सायपरमेथ्रीन 25% अशा प्रकारची औषधे पाण्यात सोडली जातात. या औषधामुळे मासे बेशुद्ध होऊन किंबहुना काही मृत होऊन वर तरंगत येतात व तात्काळ हे मासे गोळा करून बाजारात विकण्यासाठी आणले जातात. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून अशा पद्धतीने मच्छीमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस प्रमुख श्री. शिरीष देशपांडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या काही मच्छीमारांकडून मासे पकडण्यासाठी अघोरी कृत्य करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कमी वेळात भरपूर मासे मिळावेत, यासाठी पाण्यात क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथ्रीन 25% अशा प्रकारची औषधे घेतली जातात. औषधाचे पाण्यात मिश्रण झाल्यानंतर औषधाच्या स्वभाव गुणधर्मानुसार विषारी गॅस तयार होतो व हा विषारी गॅस पाण्यामार्फत माशांच्या पोटात जाऊन पाच ते सहा तासात मासे बिशुद्ध होतात व हे मासे एका कड्याला तरंगत येतात. मच्छीमार हा सगळा मासा गोळा करून बाजारात तात्काळ विक्रीसाठी नेतात.
क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथ्रीन हे प्रभावी कीटकनाशक आहे. मुख्यत: लष्करी अळी, मावा, तुडतुडे, घोंगण यासाठी सर्व पिकांवर हे शेवटचा पर्याय म्हणून औषध वापरले जाते. आता या प्रकारामुळे नदीपात्रातील ज्या ज्या ठिकाणी मासे आहेत, त्या पाण्याच्या पाणवठ्यावर दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नाईलाजाने हे वासयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. या औषधाचा परिणाम माशाच्या शरीरावर होत असून मासे खाणाऱ्यांना सुद्धा आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार चालू असून प्रशासन खात्याला अद्याप याची कसलीही माहिती नाही.
एका मच्छीमाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या आमच्या मालकीचे आमच्या ताब्यातील मासे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नाईलाज आणि तात्काळ सर्व एकाच वेळी मासे पकडण्यासाठी हा प्रकार काही मच्छीमार करत आहेत. याबाबत मत्स्यपालन विभागालाही माहिती देऊन तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?