Uncategorized

महिलांची कुजबुज !!! सात जन्मी हाच पती असावा आणि विधान परिषदेत दादा व विधानसभेत भाऊ आमदार असावेत

माळशिरस (बारामती झटका)

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न, दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले, नातू यांनी माझा प्रपंच विस्तारीत व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करून सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना वटपौर्णिमेच्या दिवशी करीत असतात.

योगायोगाने वटपौर्णिमेच्या दिवशी विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उर्फ रणजीतदादा व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते उर्फ रामभाऊ यांचा माळशिरस तालुक्यातील वटपौर्णिमेचा दिवस शनिवार दि. 3 जून व रविवार दि. 4 जून या दोन दिवशी माळशिरस तालुक्यातील विकासकामांचा झंजावाती उद्घाटन सोहळा पाहून महिलांमध्ये कुजबूज सुरू होती. सात जन्म हाच पती असावा आणि विधान परिषदेत रणजीतदादा व विधानसभेत रामभाऊ आमदार असावेत असाही संकल्प महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त केलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने व माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस तालुक्यामध्ये दोन दिवसाचा भरगच्च उद्घाटन समारंभ सुरू आहे. त्यांच्या समवेत साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, शिवामृत दूध संघ, या संस्थांचे आजी-माजी संचालक, सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या समवेत उद्घाटन समारंभ धूमधडाक्यात सुरू आहे.
शनिवार दि. 3 जून 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळीपर्यंत उद्घाटन समारंभ सुरू होता. त्यामध्ये मोजे गुरसाळे येथील खंडोबा मंदिर सभामंडप भूमिपूजन, व्यायाम शाळा इमारत भूमिपूजन, पेव्हर ब्लॉक बसवणे, काँक्रीट रस्ता उद्घाटन, मौजे कारूंडे येथील धर्मपुरी बंगला ते कारूंडे रस्ता भूमिपूजन, महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राम मंदिर पाणी टाकीचे भूमिपूजन, मौजे धर्मपुरी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, मौजे डोंबाळवाडी कुरबावी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, पेव्हर ब्लॉक बसवणे भूमिपूजन, काँक्रीट रस्ता भूमिपूजन, जिनपुरी ते डोंबाळवाडी रस्ता भूमिपूजन, मौजे कळंबोली येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, मौजे शिंदेवाडी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, व्यायाम शाळा इमारत भूमिपूजन, लक्ष्मी मंदिर सभा मंडप भूमिपूजन, मारुती मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे, आरो प्लांट बसवणे, शिंदेवाडी ते हनुमंतवाडी रस्ता भूमिपूजन, मौजे पिंपरी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, मौजे गिरवी येथील दलित वस्ती सुधार योजना कामांचा भूमिपूजन, मारुती मंदिर सभा मंडळ भूमिपूजन, मृदा व जलसंधारण विभाग सोलापूर तलाव भूमिपूजन, बौद्ध विहार बांधकाम भूमिपूजन, सोमलिंग मंदिर बर्वे वस्ती सभामंडप भूमिपूजन, श्री. पोपटराव काळे शेत ते भवानी कृष्णा सावंत शेत पानंद रस्ता भूमिपूजन, मौजे भांब येथील गोसावी बुवा मंदिर सभा मंडप भूमिपूजन, दुर्गा माता मंदिर सभामंडळ भूमिपूजन, बौद्ध समाज मंदिर सभामंडप भूमिपूजन, भांब ते संभाजी बाबा रस्ता भूमिपूजन, संभाजी बाबा मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवणे, भांब जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, दलित वस्ती योजना कामाचे भूमिपूजन मृद व जलसंधारण विभाग सोलापूर तलाव भूमिपूजन असा भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे.

आज रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळीपर्यंत मौजे आनंदनगर येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, मोजे कोंडबावी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, महालक्ष्मी मंदिर सभा मंडप भूमिपूजन, मारुती मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे, मौजे चाकोरे येथील जलजीवन मिशन योजना पाणी टाकीचे भूमिपूजन, चाकोरे ते आनंदी गणेश रस्ता लोकार्पण, मौजे तिरवंडी येथील तिरवंडी ते मेडद रस्ता भूमिपूजन, बाळूमामा मंदिर सभा मंडळ भूमिपूजन, तिरवंडी ते वाघमोडे वस्ती रस्ता भूमिपूजन, मोजे कदमवाडी येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, मारुती मंदिर सभा मंडप भूमिपूजन, भोसले वस्ती येथील सिमेंट काँक्रेट रस्ता भूमिपूजन, मौजे तामशीदवाडी येथील मरीआई देवी मंदिर सभा मंडळ भूमिपूजन, मौजे जाधववाडी येथील जलजीवन मिशन योजना पाणी टाकीचे भूमिपूजन, मौजे येळीव येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, वाडी नंबर 2 मदने वस्ती रस्ता भूमिपूजन, काळा मंदिर संरक्षक भिंत भूमिपूजन, मौजे झंजेवाडी खुडूस येथील जलजीवन मिशन योजना भूमिपूजन, झंजेवाडी ते खुडूस रस्ता लोकार्पण, मौजे पिसेवाडी येथील वाघजाई यात्रा गजी ढोल कार्यक्रमास भेट असा नियोजित उद्घाटनाचा दौरा आहे.

महिलांचा सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा असतो. तोच प्रश्न दादा आणि भाऊ यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वटपौर्णिमेनिमित्त आनंदाने संसारातील सोबती असणाऱ्या पतीला दीर्घायुष्य मागत असताना राजकारणातील दादा व भाऊ जनतेची सेवा करण्याकरता आमदार असावेत अशी महिलांची कुजबुज सुरू होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button