पिडीयम पोटॅश या खताच्या नावाखाली होत असलेली शेतकऱ्यांची फसवणूक तत्काळ थांबवावी – सचिन जगताप
मुंबई (बारामती झटका)
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर विक्री होत असलेले पिडीयम पोटॅश हे निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असुन कारखान्यातील राखेपासुन गोळी तयार करून पिडीयम पोटॅशच्या नावाखाली विक्री केले जात असून शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास अजून कर्जात ढकलण्याचा हा प्रकार असुन यामध्ये कारखानदार-दुकानदार यांच्या फायद्यासाठी शेतकरी देशोधडीला लागत आहेत. तरी सदर खताच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे केली.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, महाराष्ट्रात पिडीयम पोटॅश नावाचे खत मोठ्या प्रमाणात विक्री होत असून ते विविध कारखान्यातील राखेपासून तयार केले जात असून हे खत वापरून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना उत्पादनाला फायदा होत नसून उलट शेतकऱ्यांचे जास्तीचे आर्थिक नुकसान होत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या खत विक्रीवर तात्काळ बंदी घालून कर्जबाजारी होण्यापासून रोखावे.
तसे त्याबाबतचे निवेदन कृषीमंत्री सत्तार यांचे कार्यालयीन सचिव श्री. कुलकर्णी यांचेकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी दिले आहे. याप्रसंगी सुहास राणे, मुंबई विभागीय अध्यक्ष, जगदीश मिसाळ, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic insights! Your perspective is very refreshing. For more details on this topic, visit: EXPLORE FURTHER. What do others think?