Uncategorizedताज्या बातम्या

इस्लामपूर येथील विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी निलाबाई पवार तर व्हा. चेअरमन पदी मधुकर नलवडे यांची निवड

अकलूज (बारामती झटका)

इस्लामपूर ता. माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी श्रीमती निलाबाई वसंत पवार, तर व्हाईस चेअरमनपदी श्री. मधुकर सोपान नलवडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तज्ञ संचालक पदी युवक नेते संग्राम येसाजी पाटील व जयवंत ज्ञानोबा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्था ही महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आरोग्यदूत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरस तालुक्याचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून संस्थेच्या संस्थापिका जयमाला देशमुख तथा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका (महिला मोर्चा) यांचे उत्कृष्ट नियोजन व सभासदांचे सहकार्य त्यामुळे संस्था प्रगतीपथावर कार्यरत आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. डी. पी. राऊत यांनी कामकाज पाहिले व त्यांना संस्थेचे सचिव विजयकुमार देशमुख यांनी सहकार्य केले.

यावेळी संस्थेच्या संस्थापिका जयमाला धनंजय देशमुख, माजी चेअरमन राजेंद्र पाटील, माजी व्हाईस चेअरमन दादा बुधावले, संचालक बबन दादा देशमुख, संचालक महादेव देशमुख, संचालक संजय पवार, संचालक उमेश देशमुख, संचालक चेतन देशमुख, सौ. बकुळाबाई परबतराव, संचालक विठ्ठल कुंभार याचबरोबरच ज्येष्ठ नेते हनुमंत बाजीराव पवार, माजी सरपंच शिवाजी बर्वे, माजी डेप्युटी सरपंच अशोक देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक धनाजी आप्पा पवार, जेष्ठ नागरिक रावसाहेब देशमुख, युवा नेते महादेव पवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा सहसंयोजक दिग्विजय देशमुख, माजी अध्यक्ष पोपटराव ज्योती पवार, प्रगतशील बागायतदार धनाजी देशमुख, युवराज पवार, समाधान परबतराव आदी संस्थेचे सभासद उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button