वाढदिवसाची भेट म्हणून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्या!!!!
मंगेश चिवटे यांची जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे मागणी…
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून करमाळा तालुक्यातील जलसंपदा मंत्री म्हणून तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी मंगेश चिवटे यांनी केल्यानंतर फडवणीस यांनी या योजनेला मान्यता देण्याचा शब्द दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रिटेवाडी उपसासिंचन योजनेला मंजुरी देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिली होती. ही फाईल जलसंपदा विभागाकडे आली असून जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस यांनी याला मंजुरी द्यावी, अशी विनंती करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांनी केली.
यासंदर्भात आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मंजुरी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा याचा सविस्तर अहवाल संपदा उपसचिव श्वेता पाटील यांच्याकडून मागून घेतला होता. 1000 मिलिमीटर व्यासाच्या दोन पाईपलाईन मधून 2000 हॉर्स पावरच्या बारा पंपाद्वारे ही योजना यशस्वी होऊ शकते व या योजनेसाठी अतिरिक्त 60 एकर जमीन संपादन करावी लागेल व यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, असा सकारात्मक अहवाल जलसंपदा खात्याचे श्वेता पाटील यांनी दिला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी गेली सहा महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे. जलसंपदा मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ही योजना पूर्ण होण्याचे किंवा मार्गी लागण्याचे करमाळा तालुक्यातील जनतेचे स्वप्न साकार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्रजी फडणवीस यांनी मला शुभेच्छा दिल्या. यावेळी मी माझ्या तालुक्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी, अशी मागणी फडवणीस साहेब यांच्याकडे केली. या प्रश्नासंदर्भात आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी दिलेले पत्र व जलसंपदा सचिव श्वेता पाटील यांनी दिलेला अहवाल त्यांच्याकडे दिला. संवेदनशील व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊ हा शब्द दिला. – मंगेश चिवटे, विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng