राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना होलार समाजाकडून जाहीर…
सालाबादप्रमाणे होलार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…
माळशिरस (बारामती झटका)
अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने गेली २६ वर्षे होलार समाजातील १० वी, १२ वी, डिग्री, डिप्लोमा, नेट, सेट, पिएचडी, यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ रविवार दि. १८/६/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुमंगल कार्यालय, अकलूज रोड, माळशिरस येथे आयोजित केला आहे. सदरचा पुरस्कार होलार समाजाचे मार्गदर्शक नंदकुमार केंगार यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सत्कारमूर्ती कु. किर्तनाताई दिलीप केंगार (एमपीएससी उत्तीर्ण वर्ग – १), दिपालीताई बाळू केंगार (एमपीएससी उत्तीर्ण, उद्योग निरीक्षक), कु. प्राचीताई केरबा गोरवे (एमपीएससी उत्तीर्ण), श्रीनिवास कदम पाटील (बारामती झटका, राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे.
अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने होणारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संजय जावीर (शिक्षण अधिकारी सोलापूर), बसवराज शिवपुजे (डीवायएसपी तथा पोलीस उपाधीक्षक), रवींद्र गोरवे (उपसचिव समाजकल्याण मंत्रालय), शितल आयवळे (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कु. डॉ. दिपालीताई तानाजी जावीर (बीएचएमएस त्वचारोग तज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सरिताताई सुरज हेगडे यांच्याहस्ते होणार असून यावेळी सौ. कल्याणीताई केंगार स्वागत अध्यक्ष पदी असणार आहेत. तसेच यावेळी डॉ. ज्ञानदेव ढोबळे, डॉ. राजेंद्र केंगार, एम. डी. ढोबळे सर, ॲड. भारत गोरवे, ॲड. जयमालाताई गेजगे यांची प्रेरणादायी उपस्थिती असणार आहे तसेच यावेळी घनश्याम मारुती ढोबळे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यावेळी चंद्रकांत गुळीग गुरुजी, हनुमंतराव शेलार सर, मनोहर जावीर महाराज यांची ऋषीतुल्य उपस्थिती असणार आहे तर प्रमुख उपस्थितीत मायाप्पा आयवळे (ज्येष्ठ मार्गदर्शक), विठ्ठलराव गेजगे (जेष्ठ मार्गदर्शक), रामदास शेलार सर, बाजीराव केंगार (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख), शिवाजीराव होनमाने (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), सुनील ढोबळे (पत्रकार जिल्हा उपाध्यक्ष), हनुमंत बिरलींगे (जिल्हा सदस्य), ब्रह्मदेव केंगार महाराज (समाजभूषण), लालासाहेब गेजगे महाराज (सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष), मोहनराव शेलार माजी तालुका अध्यक्ष गणेश केंगार (माजी तालुका अध्यक्ष), यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक ज्ञानेश्वर चंद्रकांत गुळीग सर (शिक्षण विभाग प्रमुख), दिनेश जावीर (तालुका अध्यक्ष), किसनराव ढोबळे सर (मार्गदर्शन समीर गांधी विद्यालय), रानबा गोरवे सर (सल्लागार), प्रणिल केंगार यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रकाशक सुनील ढोबळे (पत्रकार, जिल्हा उपाध्यक्ष), रणजीत नामदास (तालुका प्रसिद्धीप्रमुख) हे आहेत.
सदर कार्यक्रमाचे निमंत्रक महादेव केंगार (कार्याध्यक्ष), पांडुरंग नामदास (प्रमुख मार्गदर्शक), बापू ढोबळे (संरक्षण प्रमुख), विकास केंगार (सरचिटणीस), तुकाराम कांबळे (उपाध्यक्ष), सुरज हेगडे (उपाध्यक्ष), अण्णासाहेब गेजगे (युवक नेते), दादा करडे (उपाध्यक्ष), मोहनराव पारसे (संपर्कप्रमुख) नितीन गेजगे (उपाध्यक्ष), भागवत पारसे (प्रमुख सल्लागार), सागर करडे (सुळेवाडी), आनंद ऐवळे (प्रमुख संघटक), नामदेव केंगार (मार्गदर्शक), हरि तोरणे, बापूराव करडे (निमगाव), सुनील गेजगे (मांडवे), तात्या ढोबळे (मांडवे), डॉ.;संजय हेगडे (माळीनगर), गणेश जाधव (अध्यक्ष नातेपुते शहर), भारत नामदास (कारूंडे), राजाभाऊ नामदास (संपर्क प्रमुख सांस्कृतिक विभाग), अण्णा होनमाने (सल्लागार), यशवंत पारसे (अध्यक्ष लवंग), शंकर आयवळे (अध्यक्ष पद्मावतीनगर) आदी असणार आहेत. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng