भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठांचा मेळावा उत्साहात व आनंदीमय वातावरणात संपन्न झाला.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व वार्तालाप कार्यक्रम महालिंगेश्वर मंदिर परिसरामध्ये खुडूस या ठिकाणी घेण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ठ मंडळींनी उदंड प्रतिसाद दिलेला असून उत्साहात व आनंदीमय वातावरणात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ट व भाजपचे संयोजक सुरेश वामन खिस्ते लाभले होते. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रस्ताविक भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले. यावेळी गुंडोपंत मोकासी, बाबुराव खिलारे, हनुमंत ढालपे, सुरेंद्र दळवी, जगन्नाथ तांबवे, लक्ष्मण गोरड, के. के. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, युवा मोर्चा सरचिटणीस विनोद थिटे, गणेश पागे, प्रसिद्ध प्रमुख सुनील बनकर, मनोज जाधव, बलभीम जाधव, हनुमंत कर्चे, ज्ञानेश्वर शेळके, अमोल मदने, महादेव पवार, नाना चोरमले आदी उपस्थित होते. यावेळी जेवणाची व्यवस्था युवा नेते अमर मगर, नितीन मगर यांनी केली होती. कार्यक्रमासाठी तालुक्यातून ज्येष्ठ मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा वारकरी संप्रदायाचे उपरणं देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आभार प्रदर्शन बाळासाहेब वावरे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng