शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. २१ जून २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या खाशाबा जाधव इनडोअर स्टेडीयममध्ये करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी योगशिक्षक श्री. गोरख डांगे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना योगासने शिकवली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना योग शिक्षक गोरख डांगे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना जर मनाला आनंद, शांती व समाधान हवे असेल तर, योगासनाशिवाय पर्याय नाही आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्वाचे आहे. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. राजकुमार इंगोले, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अरविंद वाघमोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय मगर, प्रा. सज्जन पवार, प्रा. सौ. स्मिता पाटील, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. नंदकुमार गायकवाड तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng