अकलुज येथे श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबाराय यांच्या पालखीवरती हेलीकॉप्टरमधुन होणार पुष्पवृष्टी….
सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या योग्य नियोजनामध्ये पालखी सोहळ्याचे रिंगण पार पडत असते.
अकलूज (बारामती झटका)
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे होणार आहे. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथील भव्य प्रांगणामध्ये होत असते.
पुणे येथील उद्योगपती एल. बी. कुंजीर हे अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये पालखी विराजमान झाल्यानंतर हेलीकॉप्टरमधुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवरती पुष्पवृष्टी करणार आहेत. त्यावेळी हेलीकॉप्टरमध्ये देहु संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख अजीत मोरे, देहु संस्थान माजी अध्यक्ष बापुसाहेब मधुसुदन देहुकर महाराज, मा. विश्वस्त सुर्यकांत मोरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्यावेळी पहिले गोल रिंगण अकलूज येथे संपन्न होत असते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळ्याचे योग्य नियोजन असते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng