Uncategorized

शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान.

२४ हजार भाकरीचे वाटप तर, ९ हजार २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

संग्रामनगर (बारामती झटका)

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने जगद्गुरु तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे २४ हजार भाकरी व १२५ किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात आले.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते अन्नदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिपकराव खराडे पाटील, संस्थेचे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील प्रमुख उपस्थित होते.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. २४ जुन रोजी अकलूज (जि. सोलापूर) येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि. पुणे) येथे असतो. सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन कि.मी. असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. त्यांना घरगुती अन्नदान व्हावे, या हेतूने सन २०१५ पासून शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. अन्नदान वाटपाचे हे ९ वे वर्ष आहे.

या वाटपात संस्थेच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालया, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग शंकरनगर, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ७ हजार विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये १५ हजार भाकरी, ७० किलो पिठाचे बेसन, पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असा ग्रामीण आस्वाद दिला. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वाघ, संजय गळीतकर, प्रा. राहूल सुर्वे, अमोल फुले, सौ. सविता गायकवाड, शिवाजी पारसे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. I thoroughly enjoyed this article. Its clear, concise, and thought-provoking. Anyone else have thoughts? Check out my profile for more interesting reads!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button