उस दरात प्रति टन १०० रुपयाची वाढ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – कुबेर जाधव
मुंबई (बारामती झटका)
केंद्र सरकारने केली उस दरात प्रति टन १०० रुपयाची वाढ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. केंद्र सरकार मोठा गाजावाजा करत शेतीमालाला योग्य व किफायतशीर दरात वाढ करत असते, ऊस दराच्या बाबतीतही केंद्र सरकार त्याला अपवाद नाही. सन १७-१८ च्या गाळप हंगामात ९.५०% साखर उताऱ्यासाठी २५५० रुपये प्रति टन किंमत घोषीत करण्यात आली होती.
सहा वर्षांनंतर गाळप हंगाम २३-२४ साठी १०.२५% साखर उताऱ्यावर ३१५० रुपये प्रति टन किंमत ठरवण्यात आली आहे. म्हणजे एकीकडे साखर उतारा एक टक्का कमी करुन सहा वर्षात फक्त ६०० रुपये प्रति टन वाढ करण्यात आली/ याचा अर्थ वर्षाला फक्त १०० रुपये प्रति टन म्हणजे १० रुपये प्रति क्विंटलने वाढवताना (१.९५%) टक्क्यांनी साखर उतारा कमी करण्यात आला आहे. उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च हा २००० रुपयाच्या घरात असताना किमान ३५०० ते ४००० रुपये प्रति टन दर अपेक्षित आहे.
उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केली जात असल्याचे साखर उतारा कमी दाखवु्ला जातो. पर्यायाने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात कपात होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. – कुबेर जाधव समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent article! It provided a lot of food for thought. Lets chat more about this. Check out my profile for more insights!