Uncategorizedताज्या बातम्या

मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका पंकजाताई, माऊली पवार

सोलापूर (बारामती झटका)

आपण कॅबिनेट मंत्री असताना २०१८ साली देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आपण किती पाठिंबा दिला होता, हे मराठा समाज चांगले जाणतो. तुमच्या राजकारणासाठी मराठा तरुणांच्या भावनांशी खेळू नका. २०१६-१७ ला महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेस कोणत्याही मोर्चाला आपण पाठिंब्याचे साधे पत्रक देखील काढले नाही. हे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज चांगलेच जाणतो (बीड मोर्चा सहित). त्यावेळेसच्या मराठा आरक्षण समितीमध्ये आपणही होता. मराठा आरक्षण देणार म्हटल्यानंतर बैठकीतून आपण निघून गेला होता, हा इतिहास आहे.

स्वतःची राजकीय वाटचाल अडचणीत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाचा फायदा घेऊन मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा खोटा प्रयत्न महाराष्ट्रातील मराठा समाज खपवून घेणार नाही. तुमचे मराठा समाजावर खरोखरच प्रेम असेल तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे या मागणीला जाहीर पाठिंबा द्या. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, माथाडी म्हणून असलेला समाज तुमच्या या मागणीचे जोरदार स्वागत करेल, नाहीतरी हल्ली फेटा आणि तुमचा संपर्क राहिलाच नाही….. ! – माऊली पवार, अध्यक्ष, सकल मराठा समाज सोलापूर

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button