भाजपचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सपत्नीक माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व अक्कलकोट विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सपत्नीक माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शनिवार दि. 01 जुलै 2023 रोजी सायंकाळी सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याण शेट्टी व सौ शांभवी सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वर्गीय सौ जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What an insightful and engaging read! The author did a great job. I’m curious about others’ thoughts on this topic. Click on my nickname for more interesting content.