Uncategorized

जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योतीताई पाटील यांच्या शुभहस्ते सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे अनावरण …

मळोली (बारामती झटका)

अटल प्रतिष्ठान माळशिरस यांच्यावतीने देण्यात आलेल्या मशीनचे अनावरण मळोली ता. माळशिरस, येथे रविवार दि. 02 जुलै 2023 रोजी रोजी सायंकाळी 7:00 वाजता सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्टॅंडिंग कमिटीच्या सदस्या व निमगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. ज्योतीताई के. पाटील त्यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

सदरचा कार्यक्रम मळोली गावच्या सरपंच सौ. अर्चनाताई रणजीतसिंह जाधव व सौ. वैशालीताई इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काळे हॉस्पिटल येथे होणार आहे‌

ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना पाच रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार असून निरोगी आरोग्यासाठी सदर गोष्टीचा लाभ होणार असल्याने स्तुत्य उपक्रमाचे महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास मळोली पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस तालुका अटल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great article! I found the insights really valuable and well-presented. Curious to hear other perspectives on this. Check out my profile for more interesting reads!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button