लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा जनता दरबार शासकीय विश्रामगृह, माळशिरस येथे संपन्न होणार..
लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई सातपुते यांच्या सांत्वनपर भेटीत जनतेची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे ऐकावी लागली.
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात दोन दिवस उपलब्ध झालेले होते.
डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड या ठिकाणी मतदार संघातील लोकांना भेटीसाठी येणारे अंतर लांब होते. पावसाचे दिवस असल्याने आमदारांसाठी कोणी भेटण्यासाठी येऊ नये. मीच मतदार संघात येतो असे सांगितल्याप्रमाणे दोन दिवस मांडवे येथील निवासस्थानी जनतेच्या भावना लक्षात घेऊन दोन दिवस सकाळपासून रात्री पर्यंत बसून होते. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजामधील प्रतिष्ठित इंजिनीयर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, यांच्यासह शेतकरी बांधव व सर्व सामान्य जनता यांनी दुःखामध्ये सहभागी होऊन आमदार राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतलेली होती दुःखाच्या सांत्वनपर भेटीमध्ये अनेक लोकांची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे ऐकावी लागली.
त्यामुळे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन आज रविवार दि. 2 जुलै 2023 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये नेहमीचे ठिकाण शासकीय विश्रामगृह, माळशिरस येथे जनता दरबार होणार आहे. तरी माळशिरस तालुक्यातील व्यक्तिगत व सार्वजनिक कामे असणाऱ्या जनतेने संपर्क करावा, असे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!