सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सपत्नीक माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके व धर्मपत्नी डॉक्टर परिनिता फुके यांनी सपत्नीक माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शनिवार दि. 01 जुलै 2023 रोजी सायंकाळी सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दिनांक 30/06/ 2023 रोजी पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके व धर्मपत्नी डॉ. परिनिता फुके यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विश्वासू सहकारी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आहेत. डॉ. फुके मंत्री असताना राम सातपुते कार्यकर्ते होते. राम सातपुते यांच्या कार्याची पद्धत, नेत्यांनी टाकलेली जबाबदारी, पक्षाशी एकनिष्ठता हे सर्व डॉ. फुके यांनी जवळून पाहिलेले आहे. समाजामधील अनेक लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले होते. मात्र, राम यांना शून्य सुद्धा नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वर्गीय सौ. जिजाबाई व श्री. विठ्ठल सातपुते यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन राम यांनी विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे. याचेच फळ म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांतजी भारतीय यांच्या कृपा आशीर्वादाने माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.
विधिमंडळामध्ये आमदार राम सातपुते यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी असताना भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी कायम पाठीशी उभे राहत असत. आ. राम सातपुते यांच्यामध्ये जनतेची सेवा करण्याची मनोमन इच्छा असते. भविष्यात राम यांचे करिअर मोठे आहे. स्वर्गीय जिजाबाई यांनी मुलाच्या कर्तुत्वाला सुरुवात झालेली पाहिलेली आहे. अजून बरंच पाहण्यासारखे होते परंतु, ईश्वर सत्येपुढे इलाज नाही. अशाप्रकारे जुन्या आठवणीला उजाळा देऊन बराच वेळ उभय पती-पत्नी आमदार राम सातपुते यांच्या सांत्वनासाठी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng