कैवल्य चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे नातेपुते नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत…
माऊलींच्या आगमनाबरोबरच जोरदार पाऊसदेखील बरसला
नातेपुते (बारामती झटका)
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास । पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी ।।
या संयोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झालेले वारकरी आता वारी सोहळा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून दि. ११ जून रोजी प्रस्थान करून दि. २८ जून रोजी १९ दिवसांचा पायी प्रवास करत पंढरपूर येथे पोहचला. दि. २८ जून ते दि. २ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी होता. माऊली ज्ञानेश्वर महाराज व भगवान पांडुरंग भेट सोहळा होऊन हा पालखी सोहळा दि. ३ जुलै रोजी गोपालकाला होऊन गोपाळपूर येथून पुढे, पंढीरीचा निरोप घेऊन पंढरपूर ते आळंदी परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
माऊलींचा पालखी सोहळा वाखरी येथे पहिल्या मुक्कामी विसावला. पुढे वेळापुर येथील मुक्काम आटोपून बुधवार दि. ५ जुलै रोजी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे रिमझीम पाऊस झेलत नातेपुते नगरीत सायंकाळी दाते प्रशाला येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माऊलींचे भव्यदिव्य भक्तिमय वातावरणाच्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आरती, पुजा संपन्न होऊन पुढील वाटचालीची माहिती देण्यात आली. माऊलींची आरती संपन्न झाल्यानंतर धो धो पाऊस बरसला. यावेळी डाॅ. बा. ज. दाते प्रशाला व नातेपुते नगरपंचायत व ग्रामस्थ तसेच नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या वतीने पालखी सोहळ्याची पुर्ण व्यवस्था करण्यात आली होती. नातेपुते पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विविध लहान-मोठे पाळणे, मनोरंजनपर खेळणी, स्टॉल, हॉटेल, दुकाने लावली होती. परंतू, पाऊस आल्याने भाविकांची व दुकानदार विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ищите в гугле