माळशिरस येथील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात जन स्वराज यात्रेचे नियोजन

माळशिरस (बारामती झटका)
आज शनिवार दि. 08/07/2023 रोजी माळशिरस राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात जन स्वराज यात्रेचे नियोजन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षॲड. संजय माने, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित (दादा ) सूळ, सोलापूर जिल्हा सहसचिव वैजनाथ पालवे, सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष कविता माने यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. माळशिरस तालुक्यातून जन स्वराज यात्रेला माळशिरस तालुक्यातून 100 गाड्या जाणार असल्याची माहिती माळशिरस तालुकाध्यक्ष नारायण (आबा) देवकाते पाटील, अमोल मदने यांनी दिली.
यावेळी तालुका प्रभारी शंकर शेंडगे, महिला तालुकाध्यक्ष जयश्री गावडे, युवक तालुकाध्यक्ष रविराज शेंडगे, ब्रह्मदेव बर्वे, विधानसभा सभा उपाध्यक्ष पोपट गोरड, जयवंत सरक, जयवंत देवकते, बळवंत देवकाते, समाधान शेंडगे, रमेश हांडे, सतीश हांडे, धुळदेव चोरमले, राजकुमार साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng